महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॅडमिंटन अंतर्गत खेळाडूंची निवड चाचणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया बॅडमिंटन सेंटर जिल्हयामध्ये सुरु झालेले आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी बॅडमिंटन खेळाडूंची निवड चाचणी १४ ते १६ मार्च या कालावधीत होणार आहे. निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे होणार आहे.

निवड चाचणीसाठी १२ ते १८ वर्ष वयोगटातील खेळाडू, विद्यार्थ्याची बॅडमिंटन खेळासाठी आवश्यक कौशल्य चाचणी घेण्यात येणार असून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी विचारात घेण्यात येईल. नवोदित खेळाडूंचे कौशल्य चाचणी प्रावीण्य विचारात घेण्यात येईल. या निवड चाचणीसाठी खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २००६ ते १ जानेवारी २०१३ या कालावधीतील असणे आवश्यक आहे.

इच्छुक पात्रताधारक खेळाडूंनी आपले अर्ज, जन्म तारीख दाखला, आधार कार्ड, खेळातील प्रावीण्य प्रमाणपत्र साक्षांकित सत्यप्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर येथे निवड चाचणी स्थळी १४ मार्च २०२४ रोजी सकाळी ९ वाजता येताना सादर करावेत. सोबत सर्व प्रमाणपत्रांची मूळप्रत व आयकार्ड साईज फोटो आणावा.

निवड चाचणीसाठी खेळाडूंना स्वखर्चाने सहभागी व्हावे लागेल व येणाऱ्या खेळाडूंची निवास, भोजन व्यवस्था वैयक्तिक करावी लागणार आहे. निवड चाचणी प्रक्रियेतून निवड झालेल्या खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हास्तर खेलो इंडिया प्रशिक्षक अजय दयाळ ९५४५५२७१४३ यांचेशी संपर्क करावा. जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडू, विद्यार्थ्यांनी या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos