महत्वाच्या बातम्या

 विकृती कुष्ठरुग्णांवर मोफत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सामान्य रुग्णालय भंडारा येथे २१ व २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये विकृती आलेल्या २० कुष्ठरुग्णांची पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. कुष्ठरोगाचे लवकर निदान व उपचार न झाल्यामुळे हाताची, पायाची किंवा डोळयाची विकृती येवू शकते, विकृतीमुळे लोकांमध्ये भिती निर्माण होते, परंतु विकृतीला न घाबरता विकृती झाल्यास त्यावर शस्त्रक्रिया केल्याने विकृती बरी होते. विकृतीमुळे कुष्ठरोगाला जोडलेले कलंक मिटविण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया झालेल्या कुष्ठरुग्णांना बुडीत मजुरी म्हणुन रु. ८ हजार शासनाद्वारे दिले जातात. जिल्हयात केंद्र शासनामार्फत डॉ.कृष्णमुर्ती कांबळे (RLTRI) रायपुर छ.ग. यांचे चमुद्वारे पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबर सामान्य रुग्णालय भंडारा येथे पार पाडले. सदर शिबीराला लगतच जिल्हे गोदिंया, वर्धा व भंडारा जिल्हयातील विकृती कुष्ठरुग्णांवर  शस्त्रक्रिया करण्यात आली.  सदर शिबराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.कुष्णमुर्ती कांबळे (RLTRI) रायपुर व प्रमुख अतिथी डॉ.दिपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. भंडारा, डॉ.माधुरी देशमुख WHO प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हयातील विकृती कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया शिबीराच्या यशस्वीतेकरीता डॉ. अतुल टेभूर्णे अति. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अमित चुटे RMO, डॉ. येळणे, डॉ. रोकडे, डॉ. चोले व सामान्य रुग्णालयातील संबंधीत अधिकारी व कर्मचारी तसेच सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) भंडारा येथील अधिकारी , कर्मचारी आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी सहकार्य केले.





  Print






News - Bhandara




Related Photos