आज गडचिरोली न.प.च्या वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन


 - १४०.२७  कोटी रूपयांच्या कामांचा होणार शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
शासनाच्या विविध योजनांतर्गत गडचिरोली नगर परिषदेला प्राप्त झालेल्या १४०.२७ कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपुजन आज  नगर परिषदेच्या आवारात राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते राहतील. विशेष अतिथी म्हणून आमदार डाॅ. रामदास आंबटकर, आमदार डाॅ. देवराव होळी, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, शिक्षण सभापती वर्षाताई बट्टे, नियोजन आणि विकास सभापती प्रशांत खोब्रागडे, महिला व बालकल्याण सभापती गीताताई पोटावी, नगरसेविका माधुरी खोब्रागडे, वर्षा नैताम, नगरसेवक प्रविण वाघरे, नगरसेविका रितु कोलते, नगरसेवक गुलाब मडावी, नगरसेविका अनिता विश्रोजवार, लता लाटकर, नगरसेवक सतिश विधाते, रमेश चौधरी , नगरसेविका निता उंदिरवाडे, नगरसेवक भुपेश कुळमेथे, नगरसेविका मंजुषा आखाडे, नगरसेविका वैष्णवी नैताम, नगरसेवक केशव निंबोड, नगरसेविका रंजना गेडाम, नगरसेवक संजय मेश्राम, नितीन उंदिरवाडे, नगरसेविका पुजा बोबाटे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नंदकिशोर काबरा, रमेश भुरसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले आहे.

या कामांचे होणार भूमिपुजन

प्रभाग क्रमांक १ ते १२ मधील १५ कोटी रूपयांचे सिमेंट  काँक्रीट रस्ते, डांबरीकरण व भूमिगत गटार बांधकाम. १४.५० कोटी रूपयांचे सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकाम, डांबरीकरण, खडीकरण, नालीचे बांधकाम, ओपनस्पेस विकसीत करणे व संरक्षण भिंतीचे बांधकाम. प्रभाग क्रमांक २, ३, ४, ६, ८ ते ११ मधील ४.४१ कोटी  व ०.७२ कोटी रूपये अंदाजपत्रकीय किंमत असलेले रस्ते खडीकरण, डांबरीकरण, नाली बांधकाम, पुलाचे बांधकाम व  ओपनस्पेस विकसीत करणे. प्रभाग क्रमांक १, ५, ७ व १२ मधील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १.७४ कोटी रूपयांचे २० कामे व
१.७६ कोटी रूपयांची १५ कामे. नागरी दलितदेत्तर वस्ती सुधार  योजनेंतर्गत प्रभाग क्रमांक १,३,४,७, १० व ११ मध्ये ०.७० कोटी रूपयांचे ११ कामे, प्रभाग क्रमांक ५ व ८ मधील ०.२२  कोटी रूपयांचे सिमेंट काँक्रीट रोड व नालीचे बांधकाम. प्रभाग क्रमांक १ मध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ०.८९ कोटी रूपयांची १०  कामे. प्रभाग क्रमांक २ ते ६, ८, १० व १२ मध्ये ९ सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम. प्रभाग क्रमांक १ ते १२ मध्ये ९६.५० कोटी  रूपयांचे मलनिस्सारण प्रकल्प. प्रभाग क्रमांक १० विसापूर येथे २.९३ कोटी रूपयांचे ५ लक्ष लिटर क्षमतेची पाणी टाकी 
 बांधकाम. 

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-09-18






Related Photos