महत्वाच्या बातम्या

 स्काऊट आणि गाईड जिल्हा मेळाव्यात नव मतदार जागृती


- SVEEP कार्यक्रमांतर्गत नव मतदारांमध्ये निर्माण केली मतदान प्रक्रियेची प्रेरणा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भारत स्काऊट आणि गाईडस व शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वास स्काऊट आणि गाईड्स जिल्हा मेळावा १५ ते १७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सेंट मेरी स्कूल खात रोड भंडारा येथे सुरू आहे. या मेळाव्याचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने SVEEP कार्यक्रमांतर्गत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भंडारा यांच्या मार्गदर्शनात मतदार जागृती अभियान या ठिकाणी राबविण्यात आला.

यावेळी निवडणूक प्रक्रियेची माहिती नव मतदारांना व भविष्यातील मतदारांना करून देण्यात आली मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्तपणे मतदारांनी भाग घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांनी समाजातील घटकांना प्रेरित करावे, असे आव्हान नोडल अधिकारी  रवींद्र सलामे यांच्या द्वारा करण्यात आले. 

विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी सहायक नोडल अधिकारी SVEEP भंडारा अरुण मरगडे, विनोद किंदले॔, मंडळ अधिकारी प्रशांत राऊत, तलाठी निंबरते मॅडम कोतवाल शशिकांत आकरे, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती दुबे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक देवेंद्र आंबळे, रूपाली सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos