महत्वाच्या बातम्या

 संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी घेतली प्रतिष्ठित व्यापाऱ्यांची भेट


- गडचिरोली शहरात चालू असलेल्या गाव चलो अभियानाचा घेतला आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सशक्त भारत, स्वावलंबी भारत, विकसित भारत बनवण्याच्या हेतूने गाव चलो अभियान भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.

गाव चलो अभियानाची सुरुवात जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागांमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाचे व योजनांचे पत्र घराघरांमध्ये पोहोचविण्याचा काम करीत आहेत.

गाव चलो अभियानाचा आढावा घेण्याकरिता संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर व प्रदेश कोषाध्यक्ष अरुण लाखानी यांनी गडचिरोली शहरातील बूथवर भेट देऊन अभियानाचा आढावा घेतला व दिवारलेखन अभियाना अंतर्गत रामनगर येथे घराच्या भिंतीवर भारतीय जनता पक्षाचा चिन्ह काढून एक बार फिर मोदी सरकार २०२४ नारा देत दिवार लेखन अभियान राबविले. तसेच गडचिरोली शहरांमधील प्रतिष्ठित व्यापारी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवीजी चन्नावार मॉल चे संचालक मनोज देवकुले, मारुती सुझुकी वेन्यू ग्रुपचे एमडी विश्राम होकाम व नंदकिशोर सारडा यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामांचे व योजनांचे पत्र त्यांना दिले.

 त्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा व प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी ओल्लारवार उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos