मिंधे सरकार जनतेच्या डोळ्यात करत आहे धूळफेक : पंकज यादव जिल्हाप्रमुख
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कुडवा येथील शाखेचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांच्या हस्ते उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात राजकीय बदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राचा आणि हिंदुत्वाचा अभिमान आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला होता, मात्र काही गद्दारांनी शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या लालसेपोटी आणि भांडवलदार बनून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा त्याग करून राज्यात ऐतिहासिक बदल घडवून आणणारे मिंधे सरकार जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांशी खेळणे, गरीबांवर अन्याय, बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवणे, महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार कोणतीही जागरूकता दाखवत नाही. अशा सरकारला सत्तेतून बेदखल करण्याचे काम आम्ही, समर्पित कार्यकर्त्यांना करायचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी कुडवा येथील शाखा उद्घाटनप्रसंगी केले.
शाखा उद्घाटन कार्यक्रमास पंकज यादव, संजू समसरे, राहुलसिंग ठाकूर, चुनेश पटले, नरेंद्र दहेरे, दुर्गेश कटरे, मनीष हरिणखेडे संकेत पारधी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
News - Gondia