महत्वाच्या बातम्या

 नवीन १५० ई- बसेसला केंद्र सरकारची मान्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पीएम ई-बस योजनेंतर्गत नागपूर शहराच्या परिवहन सेवेसाठी महापालिकेला १५० ई-बसेस देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

यामुळे आता मनपाच्या आपली बस सेवेत लवकरच १५० ई-बसेस दाखल होणार आहेत. सोबतच अद्ययावत दोन चार्जिंग डेपोला मंजुरी दिली आहे. ई- बसेस प्राप्त व्हाव्यात यासाठी मनपाने प्रस्ताव पाठविला होता.

देशातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणा व शहरी वाहतुक व्यवस्थेला चालना देण्याकरिता पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक पीएम ई-बसेस योजना राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या योजनेंतर्गत केंद्राद्वारे देशभरात १० हजार ई-बसेस दिल्या जाणार आहेत. केंद्र सरकारला प्राप्त झालेल्या प्रस्तावाअंतर्गत ई-बस आणि बिहाईंड-द-मीटर पॉवर या पायाभूत सुविधांच्या विकास प्रस्तावांना केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ई-बसेसचा प्रस्ताव पाठविला होता. अशी माहिती परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांनी दिली.





  Print






News - Nagpur




Related Photos