चामोर्शी मार्गावरील शिवणी - गोविंदपूर दरम्यान पडलेले मोठमोठे खड्डे बुजवा , अन्यथा रास्ता रोको करणार


- नागरिकांचा इशारा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / येवली :
  गडचिरोली - चामोर्शी या जिल्ह्यातील महत्वाच्या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. शिवणी ते गोविंदपूर गावांदरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात घडत आहेत. नुकतेच या मार्गावर खड्ड्यामध्ये एक ट्रॅक्टर पलटले. असे अनेक अपघात घडत असून या खड्ड्यांची डागडुजी करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. 
 शिवणी, येवली, गोविंदपूर या दरम्यान असलेल्या मुख्य मार्गावरील खड्ड्यामुळे  अनेकदा अपघात होत आहेत. येणाऱ्या - जाणाऱ्या प्रवाशांना या संकटांना तोंडी द्यावे लागत आहे.  जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना  नाहक त्रास सहन कराव लागत आहे . मुख्य  म्हणजे या मार्गावरून रात्रंदिवस जड वाहतूक सुरु असते. छत्तीसगड ते तेलंगणा,   आंध्रप्रदेश मध्ये जाणारी जाड वाहने मोठमोठी यंत्रसामुग्री घेऊन जाताना दिसते.  मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणीसुद्धा साचले आहे. यामुळे खड्ड्यांचा अंदाज सुद्धा लागत नाही. यामुळे वाहने फसत आहेत.   जिल्ह्यातील स्थानिक प्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला पाहिजे.  परंतु महामार्गाचे काम सुरु होणार आहे अशी बतावणी करून वेळ मारून नेण्याचे काम केले जात आहे.   यामुळे  येवली, शिवणी, गोविंदपूर मधील  नागरिकांनी  खड्डे दुरुस्त न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-14


Related Photos