महत्वाच्या बातम्या

 बलुनद्वारे पडलेली वैज्ञानिक उपकरणे आढळल्यास प्रशासनास कळविण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत हैदराबाद येथुन सुमारे 10 बलुन उड्डानाचे आयोजन करण्यात आले आहे. कालांतराने हे बलून व त्यातील उपकरणे जिल्ह्यातील हद्दीत खाली येण्याची शक्यता आहे. असे बलून व त्यात उपकरणे आढळल्यास नागरिकांनी त्याला हात न लावता प्रशासनास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोडण्यात येत असलेल्या 10 बलुनमध्ये वैज्ञानिक उपकरणे असून ठराविक कालावधीनंतर वैज्ञानिक उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशुटसह महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यासह औरंगाबाद, बिड, नांदेड, उस्मानाबाद परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्याच्या स्थलसिमा हद्दीत खाली येण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीना ही उपकरणे दृष्टीस पडतील त्यांनी सदर उपकरणांना स्पर्श करु नये. उपकरणे आढळून आल्यास आपल्या जवळचे पोलिस स्टेशन, पोष्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनास कळवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos