महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


८ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१७१४ : छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

१८४९ : रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.

१८९९ : रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

१९३१ : महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.

१९३६ : १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.

१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

१९६० : पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.

१९७१ : NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.

१९९४ : भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.

२००० : छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.

२०१५: नीती आयोगाची पहिली बैठक

८ फेब्रुवारी जन्म

१६७७ : फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)

१७०० : डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १७८२)

१८२८ : फ्रेन्च लेखक ज्यूल्स वर्न यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९०५)

१८३४ : रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलिएव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)

१८४४ : भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.

१८९७ : भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)

१९०९ : तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९९८)

१९२५ : शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)

१९४१ : गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)

१९६३ : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.

१९६३ : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.

८ फेब्रुवारी मृत्यू

१७२५ : रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचे निधन. (जन्म: ९ जून १६७२)

१९२७ : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)

१९७१ : मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. (जन्म: ३० डिसेंबर १८८७)

१९७५ : नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिनसन यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)

१९९४ : ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊसकर यांचे निधन.

१९९४ : कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १९०२)

१९९५ : भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन.

१९९९ : आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२६)





  Print






News - todayspecialdays




Related Photos