महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


४ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

१६७० : ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.

१७८९ : अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.

१९२२ : चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.

१९३६ : कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.

१९४४ : चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.

१९४८ : श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९६१ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान.

२००३ : युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.

२००४ : मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.

२००० : विश्व कर्करोग दिन

४ फेब्रुवारी जन्म

१८९३ : मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६०)

१९०२ : धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)

१९१७ : पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८०)

१९२२ : शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी २०११)

१९३८ : लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.

१९७४ : चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा जन्म.

४ फेब्रुवारी मृत्यू

१६७० : नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन.

१८९४ : सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)

१९७४ : भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९४)

२००१ : क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकज रॉय यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९२८)

२००२ : चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९१३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos