ऑटो - दुचाकीचा अपघात, दोन ठार - सहा गंभरी जखमी


- मारेगांव येथील घटना
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगांव  :
मारेगाव पासून एक किलो मिटर अंतरावर ऑटो व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली . या अपघातात २ जण ठार झाले असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. 
ऑटो  क्रमांक MH.29 M.5284 हा बोटोणी वरुन मारेगांव कडे येत असताना दुचाकी क्र. MH 29 - k 3428 मारेगांव वरून बोटोणी कडे जात होती. विनायक कोटेक्से जवळ  मोकाट गाय आडवी आल्याने ऑटो चालकाचे  नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार  जागीच ठार झाला. 
मृतकामध्ये तुळसीराम भिमा टेकाम (४५) रा. आवळगाव, संतोष नारायण मडावी (३८) आवळगाव यांचा समावेश आहे. तर जखमीमध्ये ऑटोचालक अतुल रामदास मेश्राम (३९) बोटोणी, मारोती शिंदे (४०) बोटोणी, सुनिल भिमा तोटे (३०) बोटोणी, नीळकंठ टेकाम (३०) शिवनाळा, सुधाकर सूर्यभान वाघाडे (३०), बोटोणी, सुनिल बबन वखनोर (३०) बोटोणी यांचा समावेश आहे. घटनास्थळी मारेगाव येथील शेख शरीफ हे उपस्थित होते.  त्यांनी लगेच सहकाऱ्यांच्या  मदतीने जखमींना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. तर जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-08-30


Related Photos