रेतीची अवैध वाहतूक : ट्रॅक्टरसह चालकाला पोलिसांकडून अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात नदीपात्रातून होणाऱ्या रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात दिघोरी मोठी पोलिसांनी मोठी कारवाई करत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकाला रंगेहात पकडले. ही कारवाई १३ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिघोरी मोठी पोलिस ठाणे हद्दीतील कोच्छी परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कवासे (२९) हा चुलबंद नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरमध्ये रेती भरून तिची अवैध वाहतूक करीत होता. दरम्यान, परिसरात पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांच्या चमूला संशय आल्याने त्यांनी संबंधित ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान पंचासमक्ष केलेल्या चौकशीत रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे चालकाकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार मडावी करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात रेतीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा कारवायांमध्ये आणखी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
News - Bhandara




Petrol Price




