महत्वाच्या बातम्या

 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात वाघाचा मृत्यू


- बोर्डा नियतक्षेत्रातील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी /चंद्रपूर : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रातील बोर्डा नियतक्षेत्रात नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वन कर्मचाऱ्यांना सोमवारी गस्तीदरम्यान वाघ मृतावस्थेत आढळून आला असून वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. मृत वाघाच्या शरीरावरील खुणा व घटनास्थळावरील परिस्थितीनुसार इतर वाघाच्या झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.   

ताडोबाच्या बफर क्षेत्रातील चंद्रपूर परिक्षेत्रात वनकर्मचारी नेहमीप्रमाणे सोमवारी गस्त करीत असताना बोर्डा नियतक्षेत्रातील शेत सर्वे क्रमांक २५०/१ परिसरात नर वाघ (टी-५१) मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. ही माहिती वनाधिकाऱ्यांना दिल्यानंतर साहाय्यक वनसंरक्षक संकेत वाठोरे, एनटीसीएचे प्रतिनिधी तथा इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाहीसाठी चंद्रपूर टीटीसी केंद्रात शवविच्छेदन करून नमुने घेण्यात आले. त्यानंतर वाघाला दहन करण्यात आले. मृत वाघ जवळपास १२ वर्षाचा असून इतर वाघाच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शरीरावरील खुणा व घटनास्थळावरील परिस्थतीनुसार वनाधिकाऱ्यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos