महत्वाच्या बातम्या

 केंद्र शासनाच्या प्रमुख फ्लॅगशिप योजनांवर भर द्यावा : सम्राट राही


- विकसित भारत संकल्प यात्रा

- यात्रेचा सद्यस्थितीचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ देण्यात यावा. आयुष्यमान कार्डच्या नोंदणी वाढविण्यासोबतच इतर योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना केंद्र शासनाचे जिल्हा प्रभारी सम्राट राही यांनी दिल्या.

केंद्राच्या फ्लॅगशीप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी १५ नोव्हेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या अंमलबजावणीचा आढावा केंद्र शासनाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेले वर्धा जिल्हा प्रभारी सम्राट राही (भामसे) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकार दिपक कारंडे, क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज. पराडकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्रविण कुऱ्हे तसेच सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

आयुष्यमान भारत, जनधन योजना, पीएम किसान कार्ड, उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी प्रमुख योजनांवर भर देण्यात यावा, आयुष्मान भारत योजनेतील ज्या तालुक्यात लक्षांकाच्या तुलनेत कार्ड काढणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी आहे, अशा तालुक्यात ही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. पीएम किसान कार्ड, जनधन योजना, अटल पेंशन योजना, जीवन सुरक्षा विमा योजना, पीएम विश्वकर्मा योजना आदी योजनांची जनजागृती करावी, अशा सूचना सम्राट राही यांनी केल्या.

योजनेचा लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या मुलाखतीची चित्रफित करुन यात्रेदरम्यान प्रसारीत करण्यासोबतच केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर संबंधित विभागांनी अपलोड करावी. अपलोड करण्याबाबत तांत्रिक अडचण असल्यास तसे कळवावे, अशा सूचना राही यांनी बैठकीत दिल्या. यावेळी प्रविण कुऱ्हे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्र शासनाच्या योजनांची व विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.





  Print






News - Wardha




Related Photos