महत्वाच्या बातम्या

 विकसित भारत संकल्प यात्रेला दीड लाखांहून अधिक नागरिकांची उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यत जिल्हयातील ३६५ गावात ही यात्रा पोहोचली आहे. तसेच १ लाख ५० हजार ३४५ नागरिक या यात्रेला उपस्थित राहीले आहेत. आज या जिल्हास्तरीय मोहिमेचा आढावा सम्राट राही, (भारतीय महसूल सेवा) उपाध्यक्ष जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विवेक बोंद्रे यांनी यावेळी सादरीकरण केले. तसेच योजनाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यामध्ये भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत यादृष्टीने केंद्र शासनाने  ही यात्रा आयोजित केली आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने या माहिती, शिक्षण व संवाद मोहिमेचे आयोजन जिल्हयात करण्यात येत आहे.

यामध्ये मेरी कहाणी, मेरी जुबानी यामध्ये १ हजार ३०० हून अधिक महीला व पुरूष लाभार्थीनी त्यांचे अनुभव कथन केले आहे. तर धरती करे पुकार कार्यक्रमात ३६४ पथनाटयाचे सादरीकरण झाले आहे. जिल्हयात पाच प्रसीध्दी व्हॅनव्दारे गावागावात माहिती व संवादाचा जागर सुरू आहे.

या यात्रेतील प्रश्नमंजुषा कार्यक्रमात ९९३ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. तर हर घर जलमधील लाभार्थीना खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

विशेषत या यात्रेदरम्यान आरोग्य विभागाने केलेल्या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ ४४ हजार १९५ नागरिकांनी घेतला आहे.जिल्हयातील आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहीमेने यात्रेदरम्यान वेग घेतला असुन त्यामध्ये ८० हजार १६९ नागरिकांनी हे कार्ड काढले आहे.

पीएम उज्वला योजनेमध्ये या यात्रेदरम्यान ४ हजार ५९ लाभार्थ्यांची नोंदणी झाली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. राही यांनी या यात्रेबददल असलेल्या अडचणी जाणुन घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.





  Print






News - Bhandara




Related Photos