महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


११ जानेवारी महत्वाच्या घटना

१७८७ : विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.

१९२२ : मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.

१९६६ : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

१९७२ : पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

१९८० : बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

१९९९ : कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.

२००० : छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

२००१ : एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

११ जानेवारी जन्म

१८१५ : कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॉन ए. मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८९१)

१८५८ : हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)

१८५९ : ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचा व्हॉइसराय लॉर्ड कर्झन याचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १९२५)

१८९८ : ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.

१९४४ : झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार शिबू सोरेन यांचा जन्म.

१९५५ : उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.

१९७३ : क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.

११ जानेवारी मृत्यू

१९२८ : इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन. (जन्म: २ जून १८४०)

१९५४ : सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)

१९६६ : भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)

१९९७ : अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)

२००८ : मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३१)

२००८ : माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos