महत्वाच्या बातम्या

 निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेत प्रवेश देण्याकरीता अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्याकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या प्रवेशाकरीता १० जानेवारी २०२४ पर्यत स्विकारले जातील.यांची अनुसूचित जमातीच्या आदिवासी विर्द्याथ्यांना इयत्ता १ ली करीता शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेत प्रवेशासाठी पात्रता व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

विद्यार्थी अनुसूचित जमातीचे आदिवासी असावा, तसेच सक्ष्म अधिकारी यांचेकडून प्राप्त जातीचा दाखला जोडावा. उपविभागीय अधिकारी महसूल व सन २०२४-२५ या वर्षात पालकांचे सरासरी एकत्रित उत्पन्न १ लाखच्या आत असावा.

इयत्ता १ ली करीता जन्म दाखला. प्रवेश घेण्यापूर्वी पालकांना या कार्यालयात प्रवेशाबाबचे संमती लिहून द्यावे लागेल. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, पालकांचा रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखाली असल्यास तसा दाखला, पालक विधवा असल्यास तसा दाखला सोबत जोडावा. प्रवेश अर्ज खालील ठिकाणी निशुल्क उपलब्ध आहेत.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा तसेच गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती, भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी, लांखादूर, लाखनी, व साकोली येथील असावा. मुख्याध्यापक, शासकीय आश्रम शाळा खापा, अनुदानित आश्रम शाळा माडगी, आमगाव आदर्श, कोका जं. येरली, चांदपुर, पवनारखरी असावा.

तसेच इतर माहिती करीता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. वरील योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यां विभागानी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos