फुले आंबेडकर काॅलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे युवा माहीतीदुत कार्यशाळा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
फुले आंबेडकर समाजकार्य महाविदयालयात युवा माहीतीदुत या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवणे हा सदर कार्यशाळेचा हेतु होता. या वेळी गडचिरोली जिल्हयाचे माहीती अधिकारी सचिन अडसुळ, प्राचार्य डाॅ.एस.के. खंगार, अनूलम संस्थेचे संदिप लांजेवार, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. अजय निंबाळकर, सहकारी प्रा. दिपक तायडे उपस्थित होते. ‘युवा माहितीदुत उपक्रमातून सरकारच्या योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचतील’ असे प्रतिपादन सचिन अडसुळ यांनी केले, तर ‘ युवा माहितीदुत ॲप’ चे महत्व प्राचार्य डाॅ. खंगार यांनी सांगितले.
युवा माहितीदुत ॲप व्दारे २७ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. या करिता संदिप लांजेवार यांनी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन सहाय्यता मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. अजय निंबाळकर मांडले व आभार प्रा. दिपक तायडे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. डाॅ. रूपेंद्र गौर, प्रा.हितेश चरडे, प्रा.सुरेश कांती, प्रा.वर्षा तिडके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-14


Related Photos