चिचडोह बॅरेज पाहण्यासाठी होतेय गर्दी


- मार्कंडादेव येथे येणारे भाविक वळत आहेत चिचडोह बॅरेजकडे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मार्कंडा देवस्थानापासून ३ ते चार किमी अंतरावर वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजजची निर्मिती करण्यात आली आहे. पवसामुळे नदीचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. यामुळे बॅरेजजची ३८ दारे उघडी ठेवण्यात आली आहेत. प्रचंड पाण्याचा विसर्ग होत असून बॅरेज पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
श्रावण महिन्यास सुरूवात झाली असल्यामुळे विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. भाविक मार्कंडादेव येथे दर्शन घेतल्यानंतर आपोआपच चिचडोह बॅरेजकडे वळत आहेत. या ठिकाणी पर्यटक आनंद घेतांना दिसून येत आहेत. सध्यास्थितीत पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे बॅरेजची दारे उघडी ठेवण्यात आली आहेत. बॅरेजवरून दुचाकी वाहनांनी चंद्रपूर जिल्ह्यातसुध्दा जाता येते. यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणात ये - जा सुरू आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-13


Related Photos