महत्वाच्या बातम्या

 महानाट्य व महासंस्कृती महोत्सव आयोजनासाठी चांगले नियोजन करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाचे भव्य आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित महानाट्य व ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित विभागांनी चांगले नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केल्या.

बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेश मोकलकर व सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त वर्षभर राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. यानिमित्या राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित महानाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी महानाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

विविध प्रातांतील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या स्थानिक कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्यलढ्यातील  ज्ञात, अज्ञात लढवय्याची माहिती सामान्य नागरिकांना होण्यासाठी  महासंस्कृतीचे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत पाच दिवस महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

महोत्सवात महाराष्ट्रातील संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम, शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलेतील विविध प्रकार, कविता, देशभक्ती गीतांचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमासह हस्तकला वस्तु दालन, बचतगटांचे उत्पादन दालन, वस्त्रसंस्कृती, चित्रकला, छायाचित्र, गडकिल्ले आदी प्रदर्शनी दालने असणार आहे. 

जिल्ह्यात या दोनही कार्यक्रमास ५ ते ७ हजार दर्शकाची व्यवस्था होईल, याप्रमाणे मैदानाचे नियोजन, रंगमंच, बैठक व्यवस्था व दालने आदीची व्यवस्था तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे, वाहनतळ, पिण्याचे पाणी, निमंत्रितांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केल्या.





  Print






News - Wardha




Related Photos