महत्वाच्या बातम्या

 कुंवर तिलकसिंह नागपुरे यांच्या ११४ व्या जयंती दिनी स्मृती भवनाचे भूमिपूजन संपन्न


- कुंवर तिलकसिंह नागपुरे यांच्या नावापुढे हुतात्मा लावा : आ. विनोद अग्रवाल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : कुंवर तिलकसिंह नागपुरे यांच्या ११४ व्या जयंती कार्यक्रम निमित्त त्यांच्या सामाजिक कार्य आणि लोककल्याणकारी कार्याचे जन सामान्यांपर्यंत माहिती पोचविणे अत्यंत आवश्यक आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्याप्रचाराला शोभेल असे कार्य कुंवर तिलकसिंह यांचे होते. संपूर्ण महाराष्ट्रातील दानदात्यांची नावे काढली असता प्रमुख १० दानदात्यांमध्ये तिलकसिंह यांचे नाव येईल. २ हजार पेक्षा जास्त जमीन सामाजिक आणि सेवेला समर्पित करत दान करण्याचे कार्य केले आहे. आजच्या काळात या जमिनीची किंमतीचा अंदाज लावला तर ५००-७०० कोटी पर्यंत होईल. एवढ्या अवाढव्य संपत्ती दान करण्याचे धाडस अश्या समाजसुधारकांचे कामे जनसामान्यपर्यंत पोचविणे काळाची गरज असून भविष्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करू पाहणाऱ्या समाज सुधारकांना प्रेरणादायी कार्य तिलकसिंह यांचे आहेत. त्यांच्या सन्मान म्हणून यापुढे त्यांच्या नावापुढे हुतात्मा लावून त्यांच्या सामाजिक आणि निश्वार्थ सेवेला जगापुढे आणण्याचे कार्य करणे आहे, असे विधान आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. ते तिलकसिंह यांच्या जयंती निमित्त KTS जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कुंवर तिलकसिंह नागपुरे स्मृती भवन चे भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. कुंवर तिलकसिंह यांच्या जीवनातील प्रसंग आणि साहित्य बाबत या भवनात साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय त्यांच्या जीवनकार्यावर पुस्तकाचे प्रकाशन करून त्यांच्या कार्याला लोकांपर्यंत उजागर करण्याचे कार्य समाजाच्या माध्यमाने करण्याचे आवाहन करत या कार्याला आवश्यक ती मदत करण्याचे सुद्धा आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.

यावेळी मंचावर आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह कुंवर तिलकसिंह यांच्या कुटुंबातील सदस्य पृथ्वीराज सिंह नागपुरे, इंद्रराज सिंह नागपुरे, चैतराम सिंह नागपुरे सह कामठा, फुलचूर आणि हिरडामाली येथील नातेवाईक, माजी नगराध्यक्ष कशिश जयस्वाल, माजी न.पा. उपाध्यक्ष शिव शर्मा, अधिष्ठाता अमरीश मोहबे, अनिल हुंदानी, राजीव ठकरेले, खेमलाल माहुले, विक्की बघेले, नंदकिशोर बिरनवार, निरज नागपुरे, सुरेश लिल्हारे, आशिष नागपुरे, आशिर्वाद लिल्हारे, चैताली नागपुरे, निर्मला पतैहे, गिता लिल्हारे, पुष्पा नागपुरे, मनीषा अटराहे, योगिता लिल्हारे, रिना नागपुरे आवर्जून उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश लिल्हारे यांनी केले तर आभार टीटूलाल लिल्हारे यांनी केले.





  Print






News - Gondia




Related Photos