संततधार पावसामुळे चोप येथे घरांची भिंत कोसळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
संततधार पावसामुळे तालुक्यातील  चोप येथील  सोमेश्वर नाकाडे यांच्या घराची भिंत कोसळल्याची घटना  २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री च्या सुमारास घडली.   सुदैवान या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नाही.
गत आठवड्यापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक गावांमध्ये नागरिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. काल २ ऑगस्ट मध्यरात्रीदरम्यान सोमेश्वर नाकाडे व भजन बर्वे यांच्या घराची  विटा - मातीची भिंत कोसळली.  सुदैवाने तेथे कुणी उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी नाही. चोप गावात अनेक  नागरिकांच्या घराच्या भिंती मातीच्या आहेत. संततधार पावसामुळे मातीच्या भिंती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने गावाला भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. नाकाडे यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. याप्रकरणी तलाठी रामटेके यांनी पाहणी करून पंचनामा केला नुकसानभरपाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करणार अशी माहिती  प्रतिनिधी ला दिली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-03


Related Photos