गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ६७२.७ मी.मी पावसाची नोंद


-  चामोर्शी तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/  गडचिरोली :
जिल्ह्याचे  पर्जन्यमान १३५४.७ मी.मी असून आतापर्यंत ६७२.७ मी.मी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची टक्केवारी ४९.६६ इतकी आहे. पावसाने केवळ ६ तालुक्यात ५० टक्क्याची सरासरी ओलांडली आहे.  सर्वाधीक ७९.११ टक्के पावसाची नोंद भामरागड तालुक्यात  झाली आहे तर सर्वात कमी म्हणजे ३५.८७ टक्के पावसाची नोंद चामोर्शी तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. 
 आतापर्यंत कोसळलेल्या पावसाची तालुकानिहाय स्थिती लक्षात घेता गडचिरोली तालुक्यात आतापर्यंत ७६४.४ मी.मी.पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात मात्र ६२५.७ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. धानोरा तालुक्यात  अपेक्षीत ८४८.६ मी.मी.पैकी ७०४ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. चामोर्शी तालुक्यात ७४७.८ मी.मी.पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात मात्र ४९९.६ मी.मी.पाऊस झाला आहे. मुलचेरा तालुक्यात  ७०५ मी.मी.म्हणजे सरासरीच्या ५०.६४ टक्के पावसाची नोंद झाली असून पावसाने अपेक्षीत सरासरी गाठली आहे. देसाईगंज तालुक्यात  ६९२.५ मी.मी.पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात मात्र ६०५.९ मी.मी पावसाची नोंद झाली आहे.
आरमोरी तालुक्यात आतापर्यंत ६४७.५ मी.मी.पाऊस अपेक्षीत होता. पावसाने या तालुक्यात अपेक्षीत सरासरी ओलांडली आहे. कुरखेडा तालुक्यात ७०३ मी.मी.पावसाची नोंद झाली असून  पावसाने अपेक्षीत सरासरी गाठली आहे. कोरची तालुक्यात ७४७.८ मी.मी.पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात मात्र ६४३.२ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. अहेरी तालुक्यात पावसाने अपेक्षीत सरासरीr  ओलांडली असून या तालुक्यात ७२६.६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.
 सिरोंचा तालुक्यात जुलै अखेर ६०६.९ मी.मी.पाऊस अपेक्षीत होता. प्रत्यक्षात मात्र ४७५.२ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. एटापल्ली तालुक्यात ६८३.८ मी.मी.पाऊस अपेक्षीत  होता. या तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. भामरागड तालुक्यात जुन ते जुलै या दोन महिन्यात  ६८३.८ मी.मी.पाउुस अपेक्षीत होता. या तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून तब्बल १०३१.८१ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय मागील २४ तासात झालेल्या पावसाची टक्केवारी

गडचिरोली ४२.४२ टक्के, धानोरा ४३.९२ टक्के, चामोर्शी ३५.८७ टक्के, मुलचेरा ५०.६४ टक्के, देसाईगंज ४६.७३ टक्के, आरमोरी ५४.९६ टक्के, कुरखेउा ५०.५० टक्के, कोरची ४६.१८ टक्के, अहेरी ५५.०१ टक्के, सिरोंचा ४१.३३ टक्के, एटापल्ली ५१.६८ टक्के, भामरागड ७९.११ टक्के,  जिल्ह्याची एवूâण सरासरी ४९.६६ टक्के
 
 
    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-01


Related Photos