महत्वाच्या बातम्या

 अवैध मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी नोंदणीकृत ठिकाणाहून व नोंदणीकृत वाहनाद्वारेच ड्रायव्हिंग स्कूल चालविणे आवश्यक आहे. असे असतांना अन्य ठिकाणी शाखा दाखवून कार्यालये व नोंदणी नसलेली वाहने वापरली जात आहे. याबाबी अनधिकृत असल्याने असे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

एमएस फॉर्मवर नोंदणीकृत असणाऱ्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या पत्ताच्या ठिकाणाव्यतिरीक्त इतरही ठिकाणाहून शाखा दाखवून मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे व्यवसाय सुरू असल्याचे तसेच नोंदणी करतेवेळी ज्या वाहनांची प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात आली आहे, त्या वाहनांव्यतिरिक्त इतरही वाहने प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात अशा प्रकारे अवैध किंवा बेकायदेशिर मोटार ड्रायव्हिंग स्कुल किंवा शाखा तसेच नोंदणी नसलेली वाहने आढळून आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, यांची स्कूल चालकांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो.समीर मो.याकुब यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos