महत्वाच्या बातम्या

 कारगाव पोट निवडणूक क्षेत्रात ३ दिवस दारु विक्री बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील भिवापूर पंचायत समिती कारगाव निर्वाचक गणातील रिक्त पदाची पोट निवडणूक १७ डिसेंबरला होणार आहेत तर मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. पोट निवडणूक कालावधीत म्हणजेच मतदानाच्या पूर्वीचा दिवस १६, मतदानाचा दिवस १७ व मतमोजणीचा दिवस १८ डिसेंबर या तीनही दिवशी भिवापूर पंचायत समिती अंतर्गत कारगाव निर्वाचक गण क्षेत्रात दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जारी केले आहे.  

पोट निवडणूक क्षेत्रात सर्व अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले असून या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधीत अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानूसार सक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.  





  Print






News - Nagpur




Related Photos