आरमोरीत जोरदार पावसामुळे नंदनवन कॉलनी झाली जलमय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
येथे सतत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.  त्यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच आरमोरी येथील नंदनवन कॉलनीत चुकीच्या लेआऊट मुळे पाणी साचून राहत असून जलमय झाली आहे . 
पावसामुळे मागील वर्षी झालेल्या सीमेंट रस्त्या खालची माती निघत आहे व रस्ता केव्हा ही तुटू शकतो अशी परिस्थिती झाली आहे . त्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  तसेच अतिवृष्टी मुळे आरमोरी येथील तहसीलदारांनी  शाळेला सुट्टी जाहीर केली आहे . तसेच पुढील दोन दिवस अतिवृष्टी ची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे . दरम्यान आज सकाळी नंदनवन कॉलनी येथे नुकसान झालेल्या रस्त्याची नगराध्यक्ष पवन नारनवरे ,  आरोग्य व स्वच्छता सभापती भारत बावनथडे, पाणीपुरवठा सभापती   विलास पारधी यांनी पाहणी केली व ताबडतोब रस्ता दुरुस्तीचे काम व पाईप टाकण्याचे काम सुरु केले तसेच कोणतीही समस्या   आल्यास ताबडतोब काळविण्याचे आवाहण नगराध्यक्ष पवन नारनवरे यांनी केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-30


Related Photos