चौडमपल्ली नाल्याला पूर, आष्टी - आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील ३ दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले भरून वाहू लागले आहेत. आष्टी - आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली  नाल्याच्या पुलावर आज २९ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पाणी चढल्यामुळे वाहतूक ठप्प पडली आहे.
आष्टी - आलापल्ली मार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील आणखी काही लहान पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद झाले आहेत. बल्लारपूर - आष्टी मार्गावरील दहेली गावाजवळ निर्माण करण्यात आलेला रपटा वाहून गेल्याने तिथेही वाहतूक खोळंबली आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-29


Related Photos