बल्लारपूर - आष्टी मार्गावरील दहेली गावाजवळचा पूल वाहून गेला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
 बल्लारपूर - आष्टी मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळ तयार करण्यात आलेला पर्यायी पूल आज २९  जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या च्या सुमारास वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.  
 बल्लारपूर - आष्टी मार्गावर  राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून तेथे दुसऱ्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामासाठी त्याला लागूनच एक उपरस्ता पाईप टाकून तयार केला होता. हा उपरस्ताच वाहून गेला आहे. या ठिकाणी शेकडो गाड्या खोळंबल्या असून प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत. येथे काल रात्रीपासून जोरदार वृष्टी सुरू आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-29


Related Photos