महत्वाच्या बातम्या

 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची सेवाग्राम आश्रमास भेट सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ : आदिती तटकर


- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन

- प्रार्थनेत सहभाग, सूतकताई पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमास भेट दिली. बापू कुटीसह आश्रम परिसराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे दीर्घकाळ वास्तव्य असलेले सेवाग्राम आश्रम निरंतर प्रेरणा देणारे स्थळ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आश्रमात आगमण झाल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आदी निवास, कस्तुरबा गांधी वास्तव्यास असलेले ‘बा’ कुटी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेले बापू कुटी, गांधीजींचे तत्कालीन कार्यालय आदींना भेटी देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठाच्यावतीने सुत व सुतापासून कापड निर्मिती केली जाते. त्याची देखील त्यांनी पाहणी केली.

प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना आश्रम व तेथील ऐतिहासिक महत्वाची माहिती देण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेचा संदेश दिला. देशाला दिशा देण्याचे काम केले. आपल्या आयुष्याचा महत्वपूर्ण काळ त्यांनी सेवाग्राम आश्रमात घालविला. त्यामुळेच हे ठिकाण संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. बापूंचे येथील वास्तव्य कसे राहिले असेल, हे येथे आल्यानंतर पाहायला मिळाले असल्याचे आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos