महत्वाच्या बातम्या

 जि.प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्य विनम्र अभिवादन                            


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे ६ डिसेंबर २०२३ रोज बुधवार ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथील पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर, सहायक शिक्षक अशोक जुवारे, जगदीश कळाम, राजकुमार कुळसंगे, चंद्रकांत वेटे, कमलाकर कोंडावार सर तसेच शाळेतील असंख्य विद्यार्थी यांचे प्रमुख उपस्थितीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्य उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर, सहायक शिक्षक अशोक जुवारे, राजकुमार कुळसंगे यांनी आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले. तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने इयत्ता ५वी, ६वी, ७वी तील काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर भाषणे दिली.  

आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून अशोक जुवारे, जगदीश कळाम, राजकुमार कुळसंगे, चंद्रकांत वेटे, कमलाकर कोंडावार आदी मान्यवर लाभले होते.  

सर्वप्रथम उपस्थित प्रमुख मान्यवरांचे हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ भांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याची ओळख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जगदीश कळाम यांनी केले. कार्यकमाचे शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos