महत्वाच्या बातम्या

 जागतिक दिव्यांग दिनानिमित्य देसाईगंज शहरात मुख्य मार्गाने दिव्यांग विद्यार्थ्यांची सन्मान रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळां व युथ ४ जॉब्स फाउंडेशन ग्रॉस रूट अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्य रविवारला देसाईगंज शहरात मुख्य मार्गाने दिव्यांग विद्यार्थ्यांची सन्मान रॅली काढण्यात आली. 

या रॅली द्वारे दिव्यांगांच्या विविध योजना बाबत जनजागृती करण्यात आली. नंतर दिवसभर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या व बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम असे आयोजन केले होते. 

या कार्यक्रमांमध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भुयार अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली, पुष्पलता आत्राम जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व सर्व अपंग शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व युथ फॉर जॉब फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख उमेश बन्सोड किशोरजी मेश्राम व आरोग्य विभाग यांच्यासह व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos