महत्वाच्या बातम्या

 गोंदिया जिल्ह्यातील १०२ प्रणाली अंतर्गत रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या वाहन चालकांनी मानले आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार


- थकित १९ महिन्यांचा पगार चालकांच्या खात्यात जमा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधि / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात १०२ प्रणाली अंतर्गत रुग्णवाहिका सेवा पुरविली जाते. पण २४ तास सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना एप्रिल २०२२ पासून पगार देण्यात आला नवता यामुळे चालकांचे जगणे कठीण झाले होते. थकीत १९ महिन्यांचे पगार खात्यात जमा करण्यात यावे या उद्देशाने रुग्णवाहिका चालकांनी आमदार विनोद अग्रवाल यांचा दरवाजा ठोठावला होता. 

मंत्रालय स्तरावरून कार्यवाही करुन अखेर ८ नोव्हेंबर २०२३ ला ६७ रुग्णवाहिका चालकांच्या खात्यात प्रती व्यक्ति ३ लाख ५४ हजार रुपए प्रमाणे थकीत १९ महिन्याचे वेतन जमा करण्यात आले. यामुळे रुग्णवाहिका चालकांची दिवाळी अंधारात राहता राहता राहिली आणि गोड झाली. 

थकीत १९ महिन्याचे वेतन जमा करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जनतेच्या आमदाराचे अभिनंदन करण्यासाठी रुग्णवाहिका चालकांनी आमदार कार्यालय गाठून आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहेत. ज्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी रुग्णवाहिका चालकांच्या समस्या आपल्या माध्यमातून सोडविल्या गेल्याबाबत समाधान व्यक्त केले.





  Print






News - Gondia




Related Photos