महत्वाच्या बातम्या

 संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून : तीन विधेयकांवर चर्चेची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी दोन डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

सर्वपक्षीय बैठक ही साधारणपणे एक दिवस आधी बोलावली जाते. पण यावेळी पाच राज्यांच्या विधानसभेचा निकाल ३ डिसेंबर रोजी असल्याने ही बैठक २ डिसेंबरला बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीचा परिणाम हिवाळी अधिवेशनावर दिसू शकतो.

टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर झालेले कॅश फॉर क्वेश्चन आरोप आणि त्यासंदर्भात लोकसभेच्या समितीला दिलेला अहवालसुद्धा या अधिवेशनात सभागृहात सादर केला जाऊ शकतो. समितीने महुआ मोइत्रा यांना लोकसभेतून निलंबित करण्याची शिफारस केली आहे.

हिवाळी अधिवेशनात तीन विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यात गृह प्रकरणांच्या स्थायी समितीने नुकत्याच तीन विधेयकांवर अहवाल स्वीकारला आहे. संसदेत बऱ्याच काळापासून एक विधेयक प्रलंबित आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात हे विधेयक आहे. पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या या विधेयकाला सरकारने विरोधक आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधानंतर विशेष अधिवेशनात मंजूर करता आलं नाही.

सरकार या विधेयकाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा दर्जा कॅबिनेट सचिव दर्जाचा करण्याच्या तयारीत आहे. सध्या त्यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो.





  Print






News - World




Related Photos