हरांबा शेतशिवारत आढळला इसमाचा मृतदेह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / साखरी :
सावली तालुक्यातील हरांबा गावाला लागून असलेल्या शेत शिवारात सोमवारी दुपारी काही शेतकरी आपल्या शेताकडे जात असतांना एका इसमाचा मृतदेह  आढळल्याने खळबळ उडाली.  मृतकाची ओळख पटली असून ताराचंद भड़के असे नाव आहे.  तो सावली तालुक्यातील उसेगांव येथील रहिवासी आहे. 
  हरांबापासून काही अंतरावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना इसम पडून दिसला. त्यानी शहानिशा करण्यासाठी जवळ जावून बघितले असता तो मृतवस्थेत असल्याचे निर्देशनास आले. या घटनेची माहिती नागरिकांनी सावली पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत्युदेहाचा पंचनामा करून मृत्युदेह शवविच्छेदनासाठी सावली रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांच्या चौकशी दरम्यान मृतक हा ताराचंद भड़के असल्याची माहिती समोर आली.मृतक हा अविवाहित असून वेडसर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे  यांच्या मार्गदर्शनात सावली पोलिस करीत आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-16


Related Photos