महत्वाच्या बातम्या

 जिल्हा तक्रार समिती अंतर्गत अशासकीय सदस्य पदाकरीता प्रस्ताव आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ ची जनजागृती करण्यात आली आहे. कलम ६ (१) अंतर्गत जिल्हास्तरीय समितीवर अशासकीय सामाजिक कार्यकर्ते असणार आहे. या समितीत कायदयान्वये स्थानिक तक्रार समितीत अध्यक्ष व दोन सदस्य हे अशासकीय सामाजिक कार्यकर्ते असणार आहे. या समितीत अध्यक्ष व दोन सदस्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी  यांना करावयाची असल्याने समितीत काम करु इच्छिणाऱ्या अशासकीय सामाजिक कार्यकर्त्या कडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

अध्यक्ष व सदस्य यांची पात्रता खालीलप्रमाणे असावी. अध्यक्षपदासाठी सामाजिक कार्याचा ५ वर्षाचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या महिलांमधून नामनिर्देशनाने अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येईल. महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संघटना, संघ किंवा लैंगीक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यामधून दोन सदस्य नामनिर्देशित करण्यात येईल. त्यांच्यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. परंतु, त्यापैकी किमान एका नामनिर्देशित सदस्यांची प्राधान्याने कायदयाशी संबंधित असावी. तसेच त्यापैकी किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागसवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. स्थानिक तक्रार समीतीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक नसेल. या समितीचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्हयापुरते मर्यादित असेल. अशासकीय सदस्यांना कायदयाच्या नियम ५ नुसार देय भत्ता व प्रवास खर्च मिळेल.

पात्रताधारक सामाजिक कार्यकत्यांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक प्रमाणपत्र, दस्तावेजासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ६ वा माळा, ए विंग, सिव्हील लाईन, नागपूर या कार्यालयात ७ दिवसाच्या आत सादर करावे.अधिक माहितीसाइी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos