महत्वाच्या बातम्या

 परीक्षा केंद्राच्या परिसरात मनाई आदेश जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट क परीक्षा २२ व २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा सार्वजनिक स्वरुपाची असल्याने याबाबत समाजाची संवेदनशिलता लक्षात घेऊन जिल्ह्याचे ग्रामीण क्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्राच्या शंभर मिटर परिसरात परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे १४४ कलमानूसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मनाई आदेश जारी केले आहे.

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लघंन केल्या कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.





  Print






News - Nagpur




Related Photos