प्रत्येक गावात सुरू आहे आपले सरकार सेवा केंद्र , किचकट प्रक्रिया झाली सोपी


- आपले सरकार पेार्टलव्दारे ४९२ सेवा  अधिसूचित केल्या आहेत आता ऑनलाईन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रा. प्रमोद मशाखेत्री  / मुल :
  डिजिटल इंडिया प्रोग्रामअंतर्गत डिजिटल महाराष्ट्र या संकल्पनेने कात टाकली असून ३४ विभागपैकी २४ शासकीय विभागाच्या ४९२ सेवा आता ऑनलाईन  झालेल्या आहेत. या सेवा मिळविण्याकरीता यापूर्वी संबंधित विभागाकडे यापूर्वी लेखी अर्ज करावा लागत असे. या टेबलवरून त्या टेबलवर अर्ज फिरत  असल्याने परवाने मिळण्यास वेळ लागत होता. परंतु शासनाने आपले सरकार
पेार्टलव्दारे ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे.   आपले सरकार पेार्टलवर नागरिक स्वतःचे खाते निर्माण करून या सेवा घरबसल्या मिळवू शकतो. तसेच तलाठी सज्याच्या ठिकाणी असलेल्या महा इ सेवा  केंद्रातून व प्रत्येक गावात स्थापन होत असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातून म्हणजेच काॅमन सव्र्हिस सेंटर (सीएससी) मधूनसूध्दा या सेवा आपण सहजपणे मिळवू शकता.
 आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपणास मोबाईलवर अर्ज दाखल केल्याची पुष्टी मिळते व संबंधित विभागाच्या अधिकारी यांना ऑनलाईन  मंजुरी विहित वेळेत  द्यावी लागते. डिजिटल स्वाक्षरीव्दारे हे प्रमाणपत्र मिळवू शकतेा. या सेवेमुळे इंटरनेट,मोबाईलव्दारे नागरिक घरबसल्या या सेवा मिळवू शकतो. अडचण  आल्यास महा-ई-सेवा केंद्र  व आपले सरकार सेवा केंद्रातून म्हणजेच काॅमन सव्र्हिस सेंटर (सीएससी) केंद्र चालकाकडून याची मदत घेऊ शकतो. जिल्हयात  महाईसेवा केंद्र चांगल्या प्रकारे काम करत असून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हयातील सर्व महाईसेवा केंद्राची कडक तपासणी सुरू आहे. या कामात  हयगय करणारे व व्यवस्थित सेवा न देणा-या केंद्रावर कठेार कार्यवाही केली जात आहे. प्रत्येक गावात आपले सरकार केंद्र म्हणजेच काॅमन सर्विस सेंन्टर (सीएससी) केंद्र स्थापन करण्याकरीता सीएससी एसपीव्हीने  दोन जिल्हा समन्वयक  यांची नेमणूमक केली आहे. मोठया गावात एकापेक्षा जास्त सीएससी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हयातील महाईसेवा  केंद्रचालक,सीएससी चालक ज्यांना व्हीएलई संबोधले जाते अशा जिल्हयातील सर्व व्हीएलईना एकत्रित आणण्याकरीता त्यांच्यात समन्वय निर्माण करण्याकरीता देशात डिजिटल इंडिया प्रोग्राम गा्रमपंचायत मध्ये सुध्दा
आपले सरकार सेवा केंन्द्राची स्थापना केली आहे. या सर्व केंद्रामुळे आता  प्रत्येक गाव हे सरकारशी जोडले जात आहे. नागरिकांना घराजवळच सर्व शासकीय अत्यावश्यक सेवा या केंद्राव्दारे मिळणार आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-12


Related Photos