महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतक-यांना सुविधा होईल : खासदार रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देवळी : नागरिकांना सुविधा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजनेचे काम वर्धा जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण झाले असून तिस-या टप्प्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करीत त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याची मागणी अनेक दिवसापासून अडेगांव व परीसरातील नागरिकांची होती, तिस-या टप्पामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्र.३ वर्ष २०२२-२३ अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ३६१ ते भिडी बाभुळगांव ते सिंगारवाडी गौळ अडेगांव ते राज्य महामार्ग २६७ वायगांव (अडेगांव ते सोनेगांव (बाई)) रस्त्याची मागणी पुर्ण झाली असुन मजबुतीकरण व नुतनीकरण काम होत असल्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शेतक-यांना सुविधा होईल असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

आज अडेगांव ता. देवळी जि. वर्धा येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा क्र.३ वर्ष २०२२-२३ अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ३६१ ते भिडी बाभुळगांव ते सिंगारवाडी गौळ अडेगांव ते राज्य महामार्ग २६७ वायगांव (अडेगांव ते सोनेगांव (बाई)) रस्त्याचे मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचा भुमीपूजन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. 

यावेळी आमदार रणजीत कांबळे, माजी प.स.सभापती सौ. विद्या भुजाडे, सरपंच सौ. दुर्गा कांबळे, उपसरपंच अनिल वानखेडे, टाकळी खोडे चे सरपंच अरुण लाहोरे, मोरेश्वर खोडके, दशरथ भुजाडे, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण मरसकोल्हे, तंटामुक्ती उपाध्यक्ष रामदास शिंगाडे, रत्नापूरचे उपसरपंच सौरभ कडू उपस्थित होते.

यावेळी ग्रा.प.सदस्य स्वाती शिंगाडे, वर्षा मरसकोल्हे, अनिता कांबळे, प्रफुल वानखेडे, देवराव भाकरे, प्रभाकर फुनसे, बालु चव्हाण, बालु कांबळे, कैलास कांबळे, विश्वास वानखेडे, निलेश हांडे, तुळसीदास ताल्हन, शिवाजी भोयर, गणपतराव शिंगाडे व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos