महत्वाच्या बातम्या

 नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन २ नोव्हेंबर २०२३ रोजी नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, भंडारा येथे करण्यात आले आहे. सदर कार्याशाळेमध्ये नैसर्गिक शेतीची संकल्पना, निविष्ठा व त्याचे व्यवस्थापन, शेती बांधावर प्रयोगशाळा अल्प खर्चात शेतातच निविष्ठा निर्मितीचे तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती किड व्यवस्थापन तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण या विविध विषयावर संबंधित विषयाचे मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेस तालुक्यातील क्लस्टरमधील इच्छुक शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी उपस्थित राहणार आहेत. जिल्हयातील सेंद्रिय शेती करण्यास इच्छुक शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा उर्मिला चिखले यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos