महत्वाच्या बातम्या

 काशी विश्वनाथ मंदिरात येणाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : उत्तर प्रदेश येथील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी लवकरच ड्रेस कोड लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंदिर न्यास येत्या काही दिवसांत होणाऱ्या बैठकीत हा प्रस्ताव समोर ठेवणार आहे.

या मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष नागेंद्र पांडेय यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. येत्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत या ड्रेस कोडविषयी चर्चा करण्यात येणार आहे. मंदिरात येताना सभ्य कपडे परिधान करावेत. जे कपडे दिसायला नीटनेटके असतील. तसेच, पुरुषांना धोतर-कुर्ता आणि महिलांना साडी परिधान करूनच मग गर्भगृहात दर्शन आणि पूजनासाठी परवानगी देण्याच्या विचारात असल्याचंही पांडेय यावेळी म्हणाले.

सध्या या मंदिरात दर्शनासाठी कोणताही ड्रेसकोड लागू नाही. मात्र, मंदिर समिती याबाबत दोन पोशाखांची निश्चिती करू शकते. मंदिरातील पुजारीही धोतरावर असतात पण त्यांनाही थंडीच्या दिवसात चादर तसंच, उन्हाळ्यात सुती उपरणे दिले जाईल. त्यावर काशी विश्वनाथ मंदिराचा लोगो असेल.





  Print






News - World




Related Photos