महत्वाच्या बातम्या

 आसाममध्ये पहिली पत्नी जिवंत असतांना दुसऱ्या विवाहाला बंदी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / आसाम : आसाम राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या विवाहाला परवानगी मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे. पहिल्या पत्नीची परवानगी असली तरीही त्यांना दुसरा विवाह करता येणार नाही, असे केलेले आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेश दिले आहेत.

आसामच्या कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, जो सरकारी कर्मचारी, पहिली पत्नी हयात असताना सरकारच्या परवानगीशिवाय दुसरा विवाह करेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. जरी त्याच्या धर्मातील वैयक्तिक कायद्यांनुसार त्याला तसे करण्याची परवानगी असेल किंवा त्याच्या पहिल्या पत्नीची परवानगी असेल तरीही त्याला दुसरा विवाह करता येणार नाही. हे आदेश तत्काळ लागू केले जातील, असे या आदेशात म्हटले आहे.





  Print






News - World




Related Photos