महत्वाच्या बातम्या

 सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रस्ताव आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयामध्ये जनगणना २०११ नुसार आदिवासी जमातीची लोकसंख्या ८८८८६ असून विविध जमातीचा समावेश आहे.या जमातीच्या लग्न समारंभ सोहळा कार्यक्रम निमित्ताने मोठया प्रमाणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि विवाह सोहळयातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामोहिक विवाह सोहळयांना प्रोत्साहन देणे करिता सामुहिक विवाह सोहळयात सहभागी होणाऱ्या वर आणि वधू यांना रु. १० हजार आर्थिक सहाय्य दिले जाते.

तसेच सदर सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेस रु. १० हजार किमान १० जोडपे याप्रमाणे दिले जाते. सदर योजना भंडारा जिल्हयात राबविणे करिता नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी योजना राबविणे करिता २० ऑक्टोबर २०२३ पर्यत प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु प्रस्ताव अप्राप्त असल्याने, पुनश्च १५ डिसेबर २०२३ पर्यत स्वयंसेवी संस्थामार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

तसेच अधिक माहिती करिता प्रकल्प कार्यालय,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,भंडारा येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos