महत्वाच्या बातम्या

 भारतीय निवडणूक आयोगाने राजकुमार राववर सोपवली मोठी जबाबदारी : नॅशनल आयकॉन म्हणून उद्या अधिकृत घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राववर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राजकुमार रावची २६ ऑक्टोबर २०२३ रोजी नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. राजकुमार राव लवकरच लोकांना मतदानाचे आवाहन करताना दिसणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

भारतातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्याचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होतील. गुरुवारी यासंदर्भात औपचारिक समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. शिवाय, पुढच्या वर्षी २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राजकुमार रावचा कसा उपयोग करुन घेते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

राजकुमार राव हा चित्रपटसृष्टीत अष्टपैलू अभिनेता, वैचारिक अभिनेता, नव विचारी अभिनेता या नावांनी ओळखला जातो. मानवी विचार आणि भारतीय सामाजिक जाणीव या बद्दल सखोल विचार करून तो त्याचे काम सर्वोत्तम करतोय. एक अभिनेता म्हणून त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. राजकुमार रावने त्याच्या दमदार कामगिरीसह २०२३ मध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. काही खास पुरस्कारांनी सन्मानित झाल्यानंतर बी-टाउनच्या शेपशिफ्टरने GQ मोस्ट इंफ्लुशियल यंग इंडियन्स अवॉर्ड पटकावला. अशा प्रतिष्ठित विजयांसह चाहत्यांनी आता अभिनेत्याला राजकुमार वाह असे संबोधण्यास सुरुवात केली आहे.





  Print






News - World




Related Photos