महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२५ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८६१ : टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.

१९५१ : स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.

१९६२ : युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९९४ : ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९९ : दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे बूकर पारितोषिक दुसर्‍यांदा मिळाले.

२००९ : बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

२५ ऑक्टोबर जन्म

८४० : सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.

१८६४ : डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०)

१८८१ : स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

१९३७ : संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै २०११)

१९४५ : अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म.

२५ ऑक्टोबर मृत्यू

१६४७ : इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १६०८)

१९५५ : शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९२१)

१९६० : फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)

१९८० : शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९२१)

२००३ : कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९२०)

२००९ : अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९२३)

२०१२ : विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५५)





  Print






News - todayspecialdays




Related Photos