महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्यांनी घेतली बैठक


- चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी.पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका राणी हिराई सभागृह येथे सफाई कर्मचारी यांच्या विविध विषयांवर आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन डॉ. वावा यांनी दिले.

या बैठकीस डॉ. वावा यांच्यासह मनपा आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा प्रशासन अधिकारी अजितकु मार डोके, सर्व नगर परिषद यांचे मुख्याधिकारी, उपायुक्त अशोक गराटे, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता अनिल घुमडे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थीत होते.

दरम्यान, मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी डॉ. वावा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीत डॉ. वावा यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कामाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, सफाई कर्मचारी हे शहराचे रक्षक आहेत. त्यांचे काम अतिशय महत्वाचे आहे. त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे.

यावेळी डॉ. वावा यांनी सांगितले की, समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. विविध योजना राबवून मुख्य प्रवाहात आणले जाईल. बैठकीमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos