महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२२ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

४००४ : ४००४ ई. पू.: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.

१६३३ : लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.

१७९७ : बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.

१९२७ : निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.

१९३८ : चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.

१९६३ : पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

१९६४ : फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.

१९९४ : भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.

२००१ : ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.

२००८ : भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले.

२२ ऑक्टोबर जन्म

१६८९ : पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १७५०)

१८७३ : अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९०६)

१९०० : भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

१९४२ : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघूवीर सिंह यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)

१९४७ : भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक दीपक चोप्रा यांचा जन्म.

१९४८ : इंग्लंडचा गोलंदाज माईक हेंड्रिक यांचा जन्म.

१९८८ : भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.

२२ ऑक्टोबर मृत्यू

१९१७ : इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.

१९३३ : थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)

१९७८ : साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)

१९९१ : देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी यांचे निधन.

१९९८ : हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९२२)

२००० : अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.

२०१४ : भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos