राज्यातील १०५ शिक्षकांना ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’


-  तंत्रस्नेही शिक्षक समुहाच्या तेरा शिक्षकांचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नंदोरी : 
स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन) सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘टीचर इनोव्हेशन ॲवार्ड-२०१९’ राज्यातील १०५ शिक्षकांना जाहीर झाला आहे. प्राथमिक गटात ६५, माध्यमिक गटात ९, क्षेत्रीय अधिकार गटात १३, विशेष पुरस्कार गटात १८ शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्रच्या 'टीचर इनोव्हेशन अवार्ड' विजेत्या शिक्षकांमध्ये हिंगणघाट येथील संजय गांधी विद्यालयाचे मिलिंद दीक्षित  प्राथमिक गटात  तोरंगण ता. त्र्यंबकेश्वर येथील शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक समूहप्रमुख नितिन केवटे, नाशिकच्या प्रेरणा एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका मंजुषा खत्री, आडगाव ता. नाशिकच्या मनपा शाळा क्र. ६ येथील शिक्षिका भारती शिंदे, फांगदर ता. देवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक खंडू मोरे, पिसवली जि. ठाणे येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अजय पाटील, लमाण तांडा बेळंब जि सोलापुर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उमेश खोसे, दहिवडी जि सांगली येथील जि. प. शाळेचे शिक्षक अजय काळे व नंदकिशोर पाटील, कासारवाडी जि. बीड येथील जि. प. शाळेच्या शिक्षिका शोभा दळवी, रोपळे खुर्द ता माढा येथील जि प शाळेचे शिक्षक श्रीकांत काशिद तसेच माध्यमिक गटात नाशिकच्या शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयाच्या शिक्षिका राजश्री कोष्टी-घायदार, वणी ता. दिंडोरी येथील केआरटी हायस्कूलचे शिक्षक प्रविण पानपाटील आणि विशेष पुरस्कार कनाशी ता. कळवण येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेचे शिक्षक आणि तंत्रस्नेही शिक्षक समुहाचे प्रसिद्धीप्रमुख  मधुकर घायदार, भालगाव ता. नेवासा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे दत्तात्रय शिंदे यांना जाहीर झाला आहे.
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा-२०१९ घेण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर ही निवड केली जाते.
या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेटिव्ह प्रॅक्टीसेस इन स्कूल एज्युकेशन कॉन्फरन्स’ मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कॉन्फरन्समध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी याठिकाणी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे, असे सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ आणि राज्य महिला समन्वयक हेमा शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रम यशास्वितेसाठी राजकिरण चव्हाण, योगेश भांगे,विजयकुमार वसंतपुरे,नवनाथ शिंदे, संदीप गुंड आदि प्रयत्नशील आहेत. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे तंत्रस्नेही शिक्षक समुहाकडून कौतुक होत आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-06-29


Related Photos