महत्वाच्या बातम्या

 रत्नापुर येथे कर्करोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


- विजयकिरण फाऊंडेशन व गुरुदेव दुर्गोत्सव मंडळाचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे विजय किरण फाउंडेशन व श्री गुरुदेव दुर्गा उत्सव मंडळ रत्नापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

राज्याचे विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार यांनी कर्करोगाचे वाढते प्रमाण व होणारे मृत्यु लक्षात घेता गोरगरीब जनतेला न परवडणारा उपचार खर्च ही बाब लक्षात घेता विजयकिरण फाऊंडेशन मार्फत कर्करोग निदान करणारे अद्यावत वाहन तयार करून रुग्णांची तपासणी करून त्यांचे वर वेळीच उपचार व्हावे, याकरिता राज्यात पहिला प्रयोग केला. 

गेल्या जुलै महिन्यापासून जिल्ह्यात हा उपक्रम सुरू आहे. याच उपक्रमाचे औचित्य साधून सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सामाजिक उपक्रमासह दुर्गोत्सव साजरा करणाऱ्या श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ यांनी विजय किरण फाउंडेशन तथा श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ रत्नापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नापूर येथे मोफत कर्करोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

याप्रसंगी शेकडून नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून शिबिरात योग्य प्रतिसाद नोंदविला. या तपासणी दरम्यान कर्करोग निदान झालेल्या रुग्णांना उपचाराकरिता नागपूर येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तर सर्वसामान्य रुग्णांना तपासणी अंती मोफत औषध वितरित करण्यात आले. 

आयोजित शिबिराचे उद्घाटन नगर काँग्रेस कमिटी रत्नापूरचे अध्यक्ष उद्धवराव तोंड फोडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, उपाध्यक्ष संजय गहाने, प्रकाश उरकुडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेश चुनारकर, डॉ.प्राची जलान व त्यांचे सहकारी तथा आरोग्य सेविका रूपाली बोरकर, विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालयाचे वेदांत मेहरकुळे, अशोक सहारे मोरेश्वर ज्ञानवाडकर, तथा श्री गुरुदेव दुर्गोत्सव मंडळ रत्नापूरचे सर्व पदाधिकारी तसेच आरोग्य शिबिरात सहभागी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. सदर शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.





  Print






News - Chandrapur




Related Photos