बिजापूर मध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान शहीद , एका गावकऱ्याचाही मृत्यू


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगड राज्यातील  बिजापूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान   आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. चकमकीदरम्यान  गोळीबारात एका गावकऱ्याचाही मृत्यू झाला आहे.
 सुरक्षा जवानांची एक चमू सीआऱपीएफच्या मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. शहीद झालेला एक जवान सीआरपीएफच्या १९९ बटालियनमधील होता.  
दरम्यान दुसऱ्या एका ऑपरेशनदरम्यान सुरक्षा जवानांनी नक्षलवादी तळ नष्ट केला. महाराष्ट्राच्या सीमालगत असणाऱ्या छत्तीसगमधील राजनंदगाव येथे चकमकीदरम्यान जवनांनी ही कारवाई केली. इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) २७ व्या बटालियनकडून ही कारवाई करण्यात आली.  Print


News - World | Posted : 2019-06-28


Related Photos